देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, प्रा. सीमा कोरे, प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. सुनील वैद्य, प्रा.स्वप्नाली झेपले, प्रा. देवयानी जोशी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने करण्यात आले होते. यानिमित्ताने प्रा. संदीप मुळ्ये यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी भारतामध्ये एकात्म मानवतावाद रुजवण्यासाठी केलेले विविध प्रयत्न याबाबत सविस्तर आढावा घेतला. दीनदयाल उपाध्याय यांच्या हिंदी साहित्यकृती विषयीची माहिती याप्रसंगी दिली. अभिवादन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित डॉक्यूमेंटरी फिल्म दाखविण्यात आली. यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय जीवनपट व सामाजिक एकात्म मानवतावादाचे कार्य यांचा समावेश होता. अभिवादन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सीमा कोरे, प्रा.संदीप मुळ्ये, प्रा. सुनील वैद्य, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा.देवयानी जोशी, प्रा.शिवराज कांबळे यांनी मेहनत घेतली.
फोटो- पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, पर्यवेक्षक प्रा. लुंगसे आणि उपस्थित शिक्षक वृंद.
