बातम्या

कल्पना कॉलेज मध्ये जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

कोकण पर्यटनावर विशेष व्याख्यान; रांगोळी स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी : २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त राष्ट्रांतील विविध पर्यटन विकास मंडळे विविध उपक्रम हाती घेत, पर्यटन विकास, सोयी सुविधा, सुलभता या संदर्भात जागृती करीत असतात. यासाठी नवनवीन संकल्पना राबविण्यात येतात यावर्षी पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही संकल्पना राबवित आहेत.
कल्पना कॉलेज ने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून कोकण आणि पर्यटन या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
कोकण प्रदेश निसर्गाने नटलेला, नद्या, डोंगर, गड, दुर्ग, समुद्र, जैवविविधता, खाद्यपदार्थ, संस्कृती ने भरलेला आहे. भविष्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्रातील संधी कोकणात उपलब्ध होणार आहेत व याची विद्यार्थ्यांना माहीती असणं आवश्यक आहे. यासाठी कोकण पर्यटन अभ्यासक आणि रत्नसिंधु टुरिझम चे संचालक प्रा. विजय हटकर सर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना प्रा. हटकर सर यांनी कोकणातील सध्याची पर्यटनाची स्तिथी, भविष्यातील वाटचाल त्यातील संधी, आव्हाने व पर्यटन व्यवसाय तसेच लांजा तालुक्यातील वैविध्य पूर्ण पर्यटन याबाबतही माहिती दिली. लांजा तालुक्यातील माचाळ, जावडे येथील कातळलेणी, कोट येथील कातळ शिल्प, अश्या ऐतिहासिक वारश्याबद्दल ही माहिती दिली.
यावेळी आयोजित रांगोळी स्पर्धेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये जागतिक पर्यटन दिन या विषयावर सुबक रांगोळी काढल्या होत्या.
कार्यक्रमाला, कल्पना असोसिएशनचे अध्यक्ष मा. प्रा. मंगेश चव्हाण सर, प्राचार्य विकी पवार, प्रा. धनश्री बंडबे, प्रा. अंकिता चव्हाण, प्रा. उर्मिला माजळकर, तसेच सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!