बातम्या

भाजपाच्या लांजा तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत मांडवकर यांची नियुक्ती.

लांजा : लांजा तालुका भाजपाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत मांडवकर यांची निवड करण्यात आली आहे .चंद्रकांत मांडवकर हे गेली अनेक वर्षे भाजपाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते भाजपाचे तालुका उपाध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. पक्ष संघटना वाढी संदर्भात त्यांचे असलेले योगदान लक्षात घेऊन भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड जाहीर केली आहे. निवडीचे पत्र चंद्रकांत मांडवकर यांना देण्यात आले आहे. तालुकाध्यक्ष या नात्याने आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करा असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आलेले आहे.                     
            दरम्यान भाजपा पक्षश्रेष्ठींनी तालुकाध्यक्ष ही महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील सर्व जुन्या नव्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची समतोल अशी कार्यकारणी स्थापन करून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण तालुक्यात पक्ष संघटना वाढीचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया नूतन तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी दिली. तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत मांडवकर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!