बातम्या

संगमेश्वर भाजपाने राबवला स्वच्छता हीच सेवा उपक्रम..

संगमेश्वर : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्ताने आज दक्षिण संगमेश्वर मंडलाच्या वतीने ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व आजुबाजूचा परिहर देवरुख येथे मोहीम राबवण्यात आली. यावेळी दक्षिणतालुका अध्यक्ष श्री. रुपेश राजेंद्र कदम व ओबीसी जिल्हा अध्यक्ष श्री. अभिजित शेट्ये यांच्या नेतृत्वात देवरुख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे स्वच्छता करण्यात आली.
          यावेळी बुद्धीजीवी प्रकोष्ठ अध्यक्ष श्री. सदानंद भागवत साहेब, नगराध्यक्षा सौ. मॄणाल शेट्ये, पदवीधर जिल्हा अध्यक्ष श्री. निलेश भुरवणे, देवरुख शहर अध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये,जेष्ठ नेते किर्वे साहेब, अनंत पाताडे ,संदिप वेलणकर , सौ. श्रध्दा इंदुलकर, सौ. मालप मॅडम, युवा नेते श्री. महेंद्र आंबेकर,श्री.बंटी पाडळकर,जेष्ठ नेते श्री. यशवंत गोपाळ, श्री.सुधिर, नगरसेवक श्री. वैभव कदम, यशवंतराव वकार्यकर्त्यांसह अनेक लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन परिसरात स्वच्छता केली. ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, समृद्ध भारत’ या अभियानाला आणखी यशस्वी बनविण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!