बातम्या

स्वरा साखळकर आणि समर्था बने राष्ट्रीय तायक्वांदोस्पर्धेसाठी रवाना

रत्नागिरी : उत्तर प्रदेश मध्ये नायडा येथील इंदोर स्टेडियम मध्ये दिनांक 5 ते 8 ऑक्टोबर 2023 रोजी ओपन नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेकरता रत्नागिरी मधील एस आर के तायक्वांदो क्लबचे खेळाडू स्वरा विकास साखळकर आणि समर्था सतीश बने हे 4 ऑक्टोबर रोजी स्पर्धेसाठी रवाना होणार आहेत, स्वरा आणि समर्थ या दोघींनी आजपर्यंत जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत विशेष ठसा मिटवला आहे या स्पर्धेकरता एस आर के तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष श्री शाहरुख शेख यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे स्वरा ही शिर्के शाळेची विद्यार्थिनी असून समर्था ही अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे, नोएडा येथील या स्पर्धे करता दोघींना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तालुकाध्यक्ष राम करा,उपाध्यक्ष मिलिंद भागवत, कोषाध्यक्ष प्रशांत मकवांना, एस आर के तायक्वांदो क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शितल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!