बातम्या

हिंदु धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणाऱ्या जितेंद्र आव्हाड व निखिल वागळे यांच्यावर हेट स्पीच चे गुन्हे दाखल करणार – श्री रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते.

चिपळूण (ओंकार रेळेकर)या देशात छत्रपति शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली तशी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेणे हे जर हेट स्पीच ठरवले जात असेल मग हिंदु धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणाऱ्या जितेंद्र आव्हाड व निखिल वागळे यांच्यावर हेट स्पीचचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई का नाही ? असे सडेतोड प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे यांनी केले.
‘ सनातन धर्म नष्ट करण्याचे अर्बन नक्षल वाद्यांचे षढयंत्र ‘ या विषयावर चिपळूण येथे माधव सभागृहात त्यांनी हिंदुत्वनिष्ठ व धर्मप्रेमी हिंदु बांधवांशी संवाद साधला.
रशिया मध्ये ज्या जोसेफ स्टालिन याला नरराक्षस संबोधले जाते त्याचे नाव धारण करणाऱ्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांचा पुत्र उदयनिधी स्टालिन याने तेथील मंदिर परिषदेतच सनातन धर्माला मलेरिया व डेंग्यू रोगासारखा असल्याचे सांगून तो नष्ट करण्याचे वक्त्याव केले आणि त्या परिषदेला उपस्थित सनातन धर्माचे पालन करणारे हिंदु त्यांना यासाठी विरोध करत नाहीत, हे दुर्दैवी आहे. उदयनिधी स्टालिनची री ओढत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि पुरोगामी पत्रकार निखिल वागळे सनातन धर्म ही देशाला लागलेली किड आहे त्यामुळे ती नष्ट केली पाहिजे, असे वक्तव्य करतात आणि आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हा दाखल करणारी पोलिस यंत्रणा मात्र सनातन धर्म नष्ट करण्याची वल्गना करणाऱ्यांवर तक्रार अर्ज देऊनही गुन्हा नोंदवत नाही. चिपळूण येथे धर्मनिष्ठ पराग ओक यांनी उदयनिधी स्टालिन , ए राजा, प्रियांक खरगे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला परंतु अजूनही त्याची दखल घेतली जात नाही. मग ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करण्याची अवमानना नाही का? या विरोधात पुढील काळात न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड व निखील वागळे यांच्या विरोधात हेट स्पीच साठी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. सनातन धर्म नष्ट करण्याचे आवाहन करणारे हे कोणी जंगलात राहणारे व बंदुका घेऊन निरपराध लोकांचे बळी घेणारे नक्षलवादी नसून शहरी भागातील उच्च शिक्षित तसेच समाज सेवा , पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्रात वावरणारे आणि पुरोगिमित्वाचा बुरखा घालणारे अर्बन नक्षलवादी आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिलेला आहे. यावरून अर्बन नक्षलवादी कोण आहेत हे आपल्याला लक्षात येईल, अशी धक्कादायक माहिती श्री रमेश शिंदे यांनी सप्रमाण उपस्थितांना दिली. यावेळी त्यांनी डॉ अमित थढानी लिखित ‘दाभोलकर – पानसरे : तपासातील रहस्ये’ या पुस्तकातील काही प्रकरणाची माहिती ही उपस्थितांना दिली. हिंदु जनजागृती समितीचे श्री सुरेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. सावर्डे, चिपळूण, गुहागर, लोटे, लवेल भागातील हिंदुत्वनिष्ठ व धर्मप्रेमी या संवादाला उपस्थिती होते. अंतिमतः निखिल वागळे व जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चिपळूण येथेही तक्रार दाखल करण्याचा हिंदुत्वनिष्ठांनी एकमताने निर्णय घेतला. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!