बातम्या

होळीवर चढून खेळला जातो लाठ्याकाठ्याचा खेळ, राजापूरच्या हर्डीतील आगळावेगळा शिमगोत्सव….

राजापूर:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे हर्डी येथे अगदी पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव साजरा करण्यात आला होळी खेळवताना होळीवर चढून पारंपरिक पद्धतीने लाठीकाठीचा खेळ खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी ‌ हर्डी व आजूबाजूच्या गावातील लोक एकच गर्दी करतात
हर्डी गावात पारंपरिक पद्धतीने फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो पोफळीच्या झाडांची होळी तोडून ती ढोलताशांच्या गजरात नाचवली जाते यावेळी होळीवर चढून लाठीकाठीचा खेळ खेळला जातो हे पाहण्यासाठी जनसागर उसळतो देवाच्या नावाचा जयघोष,फाका केला जातो
‌ होळीच्या डाबांवर २ अथवा ४ खेळाडू होळी नाचवताना चढून वर लाठीकाठीचा खेळ खेळला जातो हे डोळ्याचे पारणे फेडणारा खेळ पाहण्यासाठी आबालवृद्ध लहानथोर महिला पुरुष मंडळी मोठी गर्दी करतात होळी नाचवून झाल्यावर ती मांडावर उभी केली जाते गावात सुख समृद्धी नांदू दे इडापिडा टळू दे असे देवाला रखवालीचे गाऱ्हाणे घातले जाते होळीपासून शिमगोत्सवाची सुरुवात होते या होळीच्या काळात गावात आनंदाचे उत्साहाचे वातावरण तयार झालेले असते

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!