देवरुख
: शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या 'अहिंसा'(Non-Violence) या विषयावरील निबंध लेखन, घोषवाक्य, चित्रकला, पोस्टर मेकिंग व काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या मार्गदर्शन व नियोजनानुसार करण्यात आले होते. या सर्व स्पर्धा गांधी जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयात टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेते विद्यार्थी खालील प्रमाणे:-
चित्रकला स्पर्धा- १.सुयोग रहाटे, २.सागर जाधव, ३.स्वप्निल घडशी, ४.साक्षी माने, ५.साक्षी गवंडी. परीक्षक- कला शिक्षक सुरज मोहिते व प्रा. धनंजय दळवी.
पोस्टर मेकिंग स्पर्धा- १.सागर जाधव, २.चैतन्या तेंडोलकर, ३.साहिल मोवळे, ४. वैष्णवी हेगिष्टे. परीक्षक- विलास रहाटे व प्रा. धनंजय दळवी.
घोषवाक्य स्पर्धा- १.(विभागून) चैतन्या तेंडोलकर व प्रगती शिंदे, २.शुभदा जोयशी, ३.(विभागून) स्नेहल मोरे व मैथिली धामणस्कर, ४. गौतमी सरदेसाई.
परीक्षक- प्रा. धनंजय दळवी.
निबंध लेखन स्पर्धा- १. करिष्मा कदम, २.साहिल बारे, ३. अंजुम अली, ४.बुश्रा दसुरकर. परीक्षक- प्रा. अजित जाधव (मराठी माध्यम), प्रा. स्नेहलता पुजारी (हिंदी माध्यम), प्रा. दिवाकर पाटणकर (इंग्रजी- माध्यम).
काव्य लेखन स्पर्धा- १. किरण टक्के, २.कौस्तुभ डाऊल, ३.प्रगती शिंदे, ४. स्नेहल मोरे.
परीक्षक- प्रा. अजित जाधव.
या स्पर्धेतील सर्व स्पर्धा प्रकारांचे संकलन ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्याकरता राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनील सोनवणे (वरिष्ठ विभाग) व प्रा. सीमा शेट्ये (कनिष्ठ विभाग) आणि सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. फोटो- स्पर्धेतील लक्षवेधी चित्र, पोस्टर व घोषवाक्याचा कोलाज.
छाया- प्रा. सुभाष मायंगडे.