बातम्या

चिपळूण तालुका धनगर समाजातील खेळाडू राज्याचे तसेच देशाचे नेतृत्व करतील आमदार- शेखर निकम.

चिपळूण – अलोरे येथे चिपळूण धनगर समाजाच्या वतीने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून सदर स्पर्धेचा उदघाटन समारंभ आमदार शेखरजी निकम सर यांचे उपस्थित पार पडला. या स्पर्धेला उदघाटन प्रसंगी शुभेच्या देताना आमदार निकम सर म्हणाले कि हा एक असा समाज कि जो वाडी वस्ती पासून रानात राहतो मात्र अशा स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यातील बांधव एकत्र येतात याचा मनस्वी आनंद आहेच आणि एवढं देखणं नियोजन हे राज्यस्तरीय स्पर्धेला शोभेल असं आहे. या स्पर्धेला मागील काही वर्षे पासून येत असून यातील खेळाडू हि चांगली कामगिरी करत असून भविष्यात जिल्हा तसेच राज्य व देश पातळीवर खेळावेत त्याच प्राणे दिवसभर काबाड कष्ट करून उदरनिर्वाह चालवत असून थोडा ह्या सर्व व्यापातून हा चांगला उपक्रम राबवत आहेत अशा प्रकारची भावना व्यक्त या वेळी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, तालुकाप्रमुख विनोद झगडे, माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, धनगर समाज अध्यक्ष शांताराम येडगे, उपाध्यक्ष परशुराम खरात, लक्ष्मण येडगे, महादेव खरात, रामचंद्र वरक, समीक्षा बुरटे, गौरी खरात, वर्षा खरात, शंकर खरात, अमित चव्हाण, मयूर खेतले, जयंत शिंदे, शैलेश पवार, हरेश गजमल, अनंत कोकरे, संजय खरात,आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!