बातम्या

तालुका स्तरीय थाळी फेक स्पर्धेतदि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे ची प्राजक्ता वनये प्रथम

रत्नागिरी : १७ वर्षाखालील मुलींच्या गटात तालुका स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत प्राजक्ता दिपक वनये हिने थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. तसेच सतरा वर्षाखाली ४×४०० रिले प्रकारात या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला.तन्मय जाधव, कुणाल सारंग, कुणाल वासावे व आयान लोकरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना क्रीडा शिक्षिका सौ.ऋतुजा जाधव यांनी मार्गदर्शन केले.या विद्यार्थीनीचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे मुख्याध्यापक विलास कोळेकर यांनी अभिनंदन केले.
प्राजक्ताचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच दत्तमंदिर देवस्थान मंडळ कुडली येथे आयोजित केलेल्या समुहगीत स्पर्धेत दि मॉडेल स्कुलच्या विद्यार्थ्यानी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना अनिल धोंडू रहाटे (कुडली) यांचेकडून ठेवण्यात आलेले रोख १५५५ रुपयांचे बक्षीस ,प्रमाणपत्र व शैक्षणिक वस्तू देण्यात आल्या.या संघात आस्था शेटये, सान्वी भिंगार्डे, स्वरांगी सुर्वे, विशाखा कटनाक, निरजा धातकर, अनय शेटये, चैतन्य शेटये,पुजन धातकर, तन्मय सावत,वंश पोवार सहभागी झाले होते. त्यांना कला शिक्षक श्री विनोद पेढे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!