बातम्या

वाघ्रट ग्रामपंचायत सरपंच पदासाठी दुहेरी लढत..

कोण मारणार बाजी?

लांजा : लांजा तालुक्यातील वाघ्रट ग्रामपंचायतीची निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सात सदस्य संख्या आहे गाव पातळीवर हे सातही सदस्य बिनविरोध करण्यात यश आले आहे. त्यामुळे सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला.
मात्र सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी चुरस पाहायला मिळत आहे सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवार तितक्याच ताकतीचे असल्याने वाघ्रट ग्रामपंचायतची निवडणूक रंजक होणार हे नक्की. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे.
यातील उमेदवार प्रथमेश गोरे यांनी देखील प्रचारात बढत घेतली असून गावातील तरुणांचा वाढता पाठिंबा त्याला मिळत आहे. याच्या प्रचार फेरीमध्ये तरुणांची संख्या दिसून येत आहे. तर आपण दिलेला जाहीरनामा आणि त्यानुसार गावामध्ये केले जाणारे काम यावरती हा उमेदवार भर देत आहे. सुशिक्षित उच्चशिक्षित असा हा उमेदवार मत मागताना आपला जाहीरनामा गावासमोर ठेवत आहे आणि गावातील लोकांचा मतरुपी आशीर्वाद मागत आहे. यामध्ये त्यांनी शेती व शेतीपूरक उद्योग, पेयजल-स्वच्छता दिवाबत्ती, पायाभूत विकास व रोजगार निर्मिती, भ्रष्टाचार मुक्त कारभार, आरोग्य – शिक्षण, दिव्यांग जेष्ठ नागरिक मागासवर्गीय सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण यांसारख्या मुद्द्यांवर भर देत प्रचाराचा गाडा सुरू ठेवला आहे.
ग्रामपंचायत वाघ्रट वाडीलिंबू या गावातील सरपंच पदाचा उमेदवार प्रथमेश गोरे यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये साद तुमची साथ माझी असे म्हणत म्हटले आहे की मला सरपंच म्हणून निवडून दिल्यास सरपंच पदासाठी शासनाकडून प्रतिमहा मिळणारे तीन हजार रुपये मानधन मी गावातील सहा गरजू लोकांसाठी प्रतिमा 500 रुपये प्रमाणे वितरित करेन. वाघ्रट वाडीलिंबू गावातील ग्रामस्थ कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


▶️ ग्रामपंचायत वाघ्रट – वाडिलिंबू.
सार्वत्रिक निवडणूक 2012.
▶️ ग्रामपंचायत वाघ्रट – वाडिलिंबू सरपंच पदाचे उमेदवार प्रथमेश गोरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा….
निशाणी : ‘नारळ’.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!