मुंबई – येथील भायखळा, बाफ्टीरोड, सिद्धार्थ नगर मधील रहिवासी नवनीत निळू कांबळे (आगवेकर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ४१ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे.कालकथित नवनीत कांबळे यांचा मनमिळाऊ स्वभाव असल्याने लांजा तालुका व मुंबईतील अनेक माणसे त्यांनी जोडली होती.लांजा तालुक्यातील आगवे हे त्यांचे मूळ गाव असून मुंबईत महानगर पालिकेत ते सेवा करीत होते. बौद्धजन पंचायत समिती शाखा १३ व आगवेकर बौद्धजन विकास मंडळ यांच्या वतीने त्यांच्यावर मुंबईतल्या चंदनवाडी स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. दिवंगत नवनीत कांबळे यांचा जलदान व पुण्यानुमोदन रविवार दि. १८ जून २०२३रोजी सकाळी ११ वाजता सायन कोळीवाडा, सरदार नगर नं.४ येथील बुद्ध विहारात करण्यात येणार आहे.
- Home
- कालकथित नवनीत निळू कांबळे यांचे निधन