बातम्या

जवाहर नवोदय परीक्षेत लावगण कालकरवाडी जि प शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..

प्रतिनिधी : लांजा तालुक्यातील शाळांची गुणवत्ता ही दिवसेंदिवस वाढत जात आहे त्यातच दि 21 जून ला जवाहर नवोदय परिक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात लावगण कालकरवाडी जि प शाळेतील दोन विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत निवड झाली
या परीक्षेत आयुष्य रविंद्र कानडे व श्रवण संजय संजय कालकर या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे .या यशामध्ये त्यांची मेहनत व सहशिक्षिका श्रीमती गावित मॅडमने घेतलेल्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले आहे त्यामुळे या मुलांचे व शिक्षकांचे गावातून, पंचक्रोशीतुन कौतुक होत आहे.
जवाहर नवोदय ही 100% केंद्र शासनाची अनुदानित विद्यालय आहे ही योजना राजीव गांधी मांडली होती ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे राबिवली जातात त्यामुळे प्राथमिकता ग्रामीण भागातील विशेष गुणवान , गरजू मुलांना त्याचा विशेष फायदा होतो . दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!