श्री.संताजी जगनाडे महाराज तेली समाज सेवा समिती गोविंदपुर यांच्या वतीने जगनाडे महाराज यांची ४२४ वि जयंती साजरी.
विजय शेडमाके.
गडचिरोली:-दि.८ डिसेंबर महाराष्ट्र हि संताची भूमी आहे,संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि आणि साहित्य हे प्रेरणादायी असुन संतांनी कधीही कोणत्या एका समाजासाठी काम केले नाही.संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.आज समाजात घडत असलेल्या अनुचित घटना लक्षात घेता समाजाला खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज आहे असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.
श्री.संताजी जगनाडे महाराज तेली समाज सेवा समिती गोविंदपुर यांच्या वतीने जगनाडे महाराज यांची ४२४ वि जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सौ.योगीताताई पिपरे बोलत होत्या.
यावेळी पोलीस पाटील राजेंद्र मेश्राम, उपसरपंच प्रितम गेडाम,सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा करकाड़े,भाजपा जेष्ट तथा सामाजिक कार्यकर्त्या वछलाताई मुंघाटे,सामाजिक कार्यकर्ते धर्माजी बुरांडे,माजी उपसरपंच पांडुरंग भांडेकर,श्री.संताजी जगनाडे महाराज तेली समाज सेवा समिती गोविंदपुरचे अध्यक्ष मारोती कुनघाडकर,सचिव विलास पिपरे, उपाध्यक्ष तुळशीदास पिपरे, पांडुरंग भांडेकर,धर्माजी बुरांडे,विलास भांडेकर,येमाजी पिपरे, देवराव सातपुते तसेच प्रत्येक सामाजातील महिला व सामाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष विलासजी भांडेकर यांनी केले तर आभार विलास सोमनकर यांनी मानले.