बातम्या

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमान सेवा सुरु झालेली बंद केली ती पूर्ववत विमान सेवा सुरू करावे.तसेच गडचिरोली येथे विमान सेवा सुरू करण्यासंबंधी नियम -३७७ अन्वये अधिवेशनात मागणी केली.
खासदार अशोक नेते.

विजय शेडमाके.
दिं. ०७ डिसेंबर २०२३

गडचिरोली:- खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली मध्ये विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात नियम ३७७ अन्वये अधिवेशनात मागणी केलेली आहे. गडचिरोली-चिमूर हा देशातील सर्वात मोठा दुर्गम आणि नक्षलग्रस्त,अविकसित असलेला मागासलेला भाग असुन क्षेत्रफळाच्या दृष्टिने सुद्धा विस्तृत विस्तारीत गडचिरोली जिल्हा पसरलेला आहे.तसेच गडचिरोलीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर गोंदिया जिल्ह्यामध्ये बिरसी येथे विमानतळ उभारण्यात आले. या विमानतळावरून विमान सेवाही सुरू झाली होती, मात्र ती सध्या बंद आहे.त्यामुळे विमान सेवा सुद्धा पूर्ववत सुरू ठेवावी.या दोन्ही अधिवेशना दरम्यान खासदार अशोक नेते यांनी मागण्या केल्या.

गडचिरोली ते नागपूर विमानतळाचे अंतरही गडचिरोलीपासून 200 किलोमीटर आहे. गडचिरोलीत विमानतळ उभारणीसाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता, मात्र आजतागायत त्यात कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नाही. गडचिरोलीत विमानतळ उभारण्यासाठी अर्थपूर्ण पावले उचलावीत, अशी मी सभागृहाच्या माध्यमातून सरकारला नियम-३७७ अन्वये अधिवेशनातुन विनंती मागणी केली आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!