जिल्हा रुग्णालयात केले फळ वाटप
विजय शेडमाके
दिनांक १० डिसेंबर २०२३ गडचिरोली
गडचिरोली जिल्हा उद्योग क्रांतीचे जनक, विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर व तालुक्याच्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात वृक्षारोपणाचा कार्यक्रम तर महिला व बाल रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहाने घेण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, तालुक्याचे अध्यक्ष विलासभाऊ भांडेकर, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर , जिल्हा भाजपा सचिव वर्षाताई शेडमाके, जिल्हा भाजपा नेते मधुकर भांडेकर, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे ,माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम , निमाताई उंदीरवाडे , लताताई लाटकर, भटक्या आघाडीचे नेते गोवर्धनजी चव्हाण ,देवाजी लाटकर, प्राध्यापक उराडे सर, , कारागीर आघाडीचे नरेश हजारे ,तालुका महामंत्री बंडूभाऊ झाडे, विलास नैताम ,आदिवासी आघाडीचे विजय शेडमाके, सोमेश्वर धकाते सुरज मस्के शहर महामंत्री विनोद देवोजवार, रश्मीताई वाघमारे सुंदराबाई कडकाडे, राजूभाऊ शेरकी, डंबाजी झरकर ,बबनराव सूर्यवंशी, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.
