वाटूळ गावच्या ग्रामस्थांचे राजापूर आगारप्रमुखांना निवेदन..
राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील वाटूळ परिसरातील वाकेड, विलवडे,शिरवली,मंदरुळ ओणी आदी गावातून अनेक विद्यार्थी राजापूर येथे परिक्षा केंद्र असल्याने परिक्षेला राजापूरला जावे लागते एसटी शिवाय पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना एसटी बसवर अवलंबून रहावे लागते.
बारावीची परिक्षा सुरू आहे आणि पहिल्याच दिवशी एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागला एसटी गाड्या वेळेत न आल्याने विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली खाजगी वाहनाने प्रवास करावा लागल्याने जादा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला निदान परिक्षा काळात एसटी बसेस वेळेत सोडण्यात याव्यात यासाठी वाटूळ गावचे ग्रामस्थ श्री संतोष (बंधू) चव्हाण,कॄष्णा चव्हाण, प्रशांत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य यांनी राजापूर आगारप्रमुख सौ. शुभांगी पाटील यांना निवेदन दिले