राजापूर – :- (प्रमोद तरळ) तालुक्यातील रायपाटण येथील पाळेकरवाडी मित्र मंडळातर्फे ‘पाळेकरवाडी प्रिमियर लिग २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे
सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी पाळेकरवाडी क्रिकेट मैदान रायपाटण येथे भव्य अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सदर सामन्यातील प्रथम क्रमांक विजेत्याला रोख रु ११,१११/- आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रु ७,७७७/- आणि आकर्षक चषक तसेच सामनावीर, मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आदींना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे स्पर्धेतील सहभाग आणि इतर माहितीसाठी श्री विनायक म्हादये – 8208567104, यश पराडकर – 9607127425 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा