बातम्या

राजापूर कारवली येथे रहस्यभेद नाटकाचा प्रयोग. ….

राजापूर:- (प्रमोद तरळ) विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळ , कारवली ता.राजापूर, या संस्थेच्यावतीने सालाबाद प्रमाणे नववर्षाच्या स्वागतानिमित्त मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्त हौशीरंगभुमीवर तुफान गाजलेले प्रसिद्ध नाटककार दशरध राणे लिखित रहस्यभेद या दोन अंकी नाटकाचा प्रयोग ओमकार कला मंच (कारवली) ही संस्था सादर करणार आहे या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नाटकात रविन्द्र काटकर, सूर्यकांत राणे, प्रविण आयरे, गोपीनाथ कोळवणकर प्रसाद धनावडे, सोनु काटकर, सुशांत विश्वासराव, चेतन साळवी, संदेश भारमळ महेश हुंदळेकर आणि अभिनयतारका अंकिता चव्हाण या हौशीरंगभुमीवरील कलावंताच्या प्रमुख भुमिका आहेत
श्री विठ्ठल मंदिर कारवली, विठ्ठलवाडी येथे दि. ९ रोजी रात्री १० वाजता सदर नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळ,कारवली (विठ्ठलवाडी) आणि ओमकार कलामंच कारवली (मुंबई) यांनी केले आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!