देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विविध साहित्य, कला व क्रीडा स्पर्धांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व शिक्षक यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. स्नेहलता पुजारी, प्रा. विकास शृंगारे, डॉ. मीरा काळे, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. सुनील सोनवणे, प्रा. मृण्मयी परांजपे, अक्षय भुवड यांची उपस्थिती होती. सर्व उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांच्या स्वागतानंतर प्रा. धनंजय दळवी यांनी विद्यार्थी व शिक्षकांनी मिळवलेल्या सविस्तर यशाचा आढावा घेतला. यानंतर प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी यशस्वीताना पुष्पगुच्छ,प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित केले.
सत्कार प्राप्त विद्यार्थी
१. सागर प्रदीप जाधव- १८व्या महाराष्ट्र राज्य इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवात मुंबई विद्यापीठाकडून सहभागी होऊन लोकनृत्य प्रकारात एक सुवर्ण तर मूकनाट्य प्रकारात एक कांस्यपदक प्राप्त.
२. साहिल सुरेश मोवळे- टच ऑर्गनायझेशन, मुंबईने बाल दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी व रुपये १०,००१ बक्षीस प्राप्त.
३. पल्लवी प्रकाश सनगले- ५८व्या महाराष्ट्र राज्य महिला खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त रत्नागिरी जिल्हा महिला संघातील खेळाडू.
४. निखिल विजय सनगले, साहिल दीपक सनगले, सुजल दीपक सनगले, प्रतीक प्रवीण उबारे- ५८व्या महाराष्ट्र राज्य पुरुष खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघातून सहभागी झालेले खेळाडू.
५. प्रा. सागर शांताराम पवार- अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या मुंबई विद्यापीठ मुलींच्या खो-खो संघाचे व्यवस्थापक.
६. डॉ. वर्षा शिरीष फाटक- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ग्रंथ परीक्षण स्पर्धा: २०२२-२३ च्या तृतीय क्रमांकाच्या मानकरी.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले, दैनंदिन अध्ययन व अध्यापन कार्यासोबत साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर कायम मनन, वाचन व चिंतन करण्याची अत्यंत गरज आहे. कोणत्याही कलेत पारंगत होण्यासाठी कायम निरीक्षण व सराव आवश्यक असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले.
प्रा. धनंजय दळवी यांनी विद्यार्थ्यांच्या यशात महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या मार्गदर्शकांचे आभार मानले. यामध्ये कलेतील यशासाठी सुरज मोहिते व विलास रहाटे (चित्रकला), अक्षय शिंदे (नृत्य), आशिष पवार (नाट्य), खो-खो खेळातील यशासाठी समीर काबदूले, पंकज चवंडे, आकाश सोळंकी, यांच्यासह डॉ. मोहन अमृले (संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ), डॉ. सुनील पाटील (संचालक, विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ) आणि निलेश सावे (सांस्कृतिक समन्वयक, मुंबई विद्यापीठ) यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक विश्वास जठार, स्वप्निल कांगणे व सौरभ जाधव यांनी मेहनत घेतली.
फोटो- सत्कार झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांसह प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील आणि इतर शिक्षक वृंद
छाया- स्वप्निल कांगणे.

▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801