चिपळूण : मुंबई गोवा महामार्गाचे काम चालू असून आमदार शेखरजी निकम यानी परशुराम घाट, पेढे, वालोपे, कलंबस्ते भागाची अधिकारी वर्गाला घेऊन पाहणी केली तेथील स्थानिक ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार रखडलेली कामे तातडीने होण्यासाठी सूचनाही केल्या. यावेळी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी वालोपे, पेढे, कलंबस्ते येथील रखडलेली कामे निदर्शनास आणून दिली. तसेच जी कामे करायची आहेत ती पूर्ण झाल्यानंतर माझे निदर्शनास आणून द्यावीत. यावेळी तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते, विधानसभा अध्यक्ष दादा साळवी, युवती जिल्हाध्यक्ष दिशा दाभोळकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, माजी सरपंच रवि ताबिटकर, निलेश कदम, चंद्रकांत सावंत, विकास गमरे, गजानन महाडिक, मोहन शिंदे, विकास गुरव, सन्देश गोरीवले, दशरथ जाधव, सुधीर भोसले, तुषार गमरे, बबन पडवेकर, सीताराम पडवेकर, संतोष पानकर, उमेश आयरे, दिलीप मयेकर, सनी मयेकर, अंकुश शिगवण, बंधू भोसले, सुरेश सोलकर, रघुनाथ माली, बाबु माली, आदिनी उपस्थित राहून सूचना केल्या. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार घोरपडे, जाधव साहेब राष्ट्रिय महामार्ग, भगत साहेब एमआयडीसी, केलसकर, विस्तार अधिकारी, खोत, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, नागले रेल्वे अधिकारी आदि अधिकारी वर्ग होते.
दखल न्यूज महाराष्ट्र

▶️ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रताई वाघ यांचे रत्न नगरीत हार्दिक स्वागत..
▶️ शुभेच्छुक :- रत्नागिरी शहर व जिल्हा पदाधिकारी रत्नागिरी.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.