बातम्या

वक्रतुड ईलेव्हन रावणंगवाडी चषक 2022 मध्ये एन्जॉय आंगवली संघ विजेता..

संगमेश्वर : रावणंगवाडी चषक 2022 हि स्पर्धा शनिवार दि. 10 डिसेंबर ते रविवार दि.11 डिसेंबर 2022 रोजी संगमेश्वर तालुका मर्यादित एक ग्रामपंचायत ओव्हरम टेनिस क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली.
   ह्या स्पर्धे मध्ये 24 संघानी सहभाग घेतला होता.त्यामध्ये एन्जॉय आंगवली व साई नवलाई आंबवली ह्या दोन्ही संघामध्ये फायनल मॅच झाली.ह्या मॅच मध्ये एन्जॉय आंगवली संघाने ३ ओव्हर मध्ये  साई नवलाई संघासमोर ३३ धावांचे लक्ष ठेवले त्यामध्ये साई नवलाई सांघावर 15 धावांनी मात करत एन्जॉय संघाने विजय मिळवत  रावणंगवाडी चषकावर नाव कोरले.
               स्पर्धेमधील विजेता एन्जॉय आंगवली संघास वक्रतुड ईलेव्हन रावणंगवाडी मंडळाच्या हस्ते  रोख रक्कम १५००० रु.पारितोषिक,चषक व मेडल देउन गौरविण्यात आले.तसेच स्पर्धेमधील उपविजेता साई नवलाई आंबवली संघास दिपराज रावणंग ह्यांच्या हस्ते रोख रक्कम ९०००रू चषक व मेडल देण्यात आले. ह्या स्पर्धेमधील उत्तम गोलंदाज म्हणून साई नवलाई आंबवली संघाचा खेळाडू प्रशांत ह्याला मंडळाचे सदस्य सुरज दळवी ह्यानी चषक व मेडल देउन सन्मान केला  व स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज एन्जॉय आंगवली संघाचा मार्लेश्वर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा समिर बंडबे ह्यास मंडळाचे सदस्य रुपेश शितप यांनी चषक व मेडल  देउन  सन्मानीत केले तषेच ह्या संपुर्ण स्पर्धेतील मालिकावीर ठरला तो साई नवलाई संघाचा स्वप्नील मानकर. त्याला  जयेंद्र सोलकर ह्यानी चषक व मेडल देउन सन्मानीत केले.
           ह्या संपुर्ण स्पर्धेचे समलोचन दिनेश गुरव व विनेश साळवी ह्यानी केले. विजेता एन्जॉय आंगवली संघाकडून महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्लेयर रणजित पवार व उपविजेता साई नवलाई आबवली संंघाचा कर्णधार व संघमालक विनय बणे ह्यानी आपले मत मांडून रावणंगवाडी मंडळाने केलेले  स्पर्धेच्या आयोजनाबाबत त्यांचे आभार मानले व मंडळाच्या व खेळाडूंच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!