बातम्या

रत्नागिरी काजरघाटी येथे दीड लाखाची गोवा बनावटी दारू पकडली

रत्नागिरी : शहरालगतच्या काजरघाटी तिठा येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी दीड लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त केली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले आहे. महेश्वर हनुमंत मोरे (36, नेरुर, देऊळवाडा कुडाळ, सिंधुदुर्ग), सचिन हरिश्चंद्र तळेकर (42, तळेरे कणकवली, सिंधुदुर्ग) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील काजरघाटी परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी 16 डिसेंबर रोजी दु. 2.30 वाजण्याच्या सुमारास देवधे ते रत्नागिरी रोडवरील काजरघाटी धार रस्त्याने मारुती सुझुकी स्वीफ्ट कारमधून गोवा बनावटीची इंग्लिश दारु विकीसाठी महेश्वर मोरे आणि सचिन तळेकर जात होते. या गाडीची झाडाझडती घेतली असता कारमध्ये गोवा बनावटीची इंग्लीश दारुच्या 60 बॉटल, 1 लाख 10 हजार रुपये किंमतीची सुझुकी कंपनीची स्वीफ्ट कार असा एकूण 1 लाख 36 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित महेश्वर मोरे आणि सचिन तळेकर यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (अ), ई, 81, 83 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!