रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी प्रदेश सहकार आघाडी(प्रकोष्ठ) प्रदेश कार्यकारणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जाहीर केली असून प्रदेश संयोजक म्हणून आमदार प्रवीण दरेकर तर कोकण विभागातून प्रदेश सह संयोजक म्हणून ॲड. दीपक पटवर्धन यांच्या जबाबदारी देण्यात आली आहे.

▶️ नवीन वर्षाच्या रत्नागिरी शहर वासीयांना खूप खूप शुभेच्छा..
▶️ शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)
दखल न्यूज महाराष्ट्र..
ॲड. दीपक पटवर्धन यांच्याकडे आता दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी असून प्रदेश सहसंयोजक ही अतिरिक्त जबाबदारी प्रदेशाने दिली आहे. ॲड. पटवर्धन हे गेली 30 वर्षे सहकार क्षेत्रात काम करत असून कोकणात सहकार रुजवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. स्वामी स्वरूपानंद पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष असून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेली 18 वर्षे संचालक म्हणून कार्यरत आहेत. नुकतीच राज्य फेडरेशन च्या संचालकपदी बिनविरोध दुसऱ्यादा निवड झाली आहे. जिल्ह्यात भाजपा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर जिल्हयात भाजपा वाढीला जोर वाढू लागला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य वाढले असून त्यामध्ये ॲड. पटवर्धन यांनी महत्वाची भूमिका आहे. कोकणात सहकार अजून मजबूत होण्यासाठी प्रदेश भाजपाने ॲड. पटवर्धन यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी देऊन भाजपा अधिक मजबूत करण्यासाठी अधिक पाठबळ दिले आहे. या निवडीबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांचे अनेक जणांनी अभिनंदन केले आहे.

▶️ भाजपा. अल्पसंख्याक मोर्चा रत्नागिरी शहर उपाध्यक्ष श्री. मन्सूर मुकादम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
▶️ शुभेच्छुक : भाजपा अल्पसंख्याक मोर्चा रत्नागिरी शहर.
दखल न्यूज महाराष्ट्र..