रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल शुक्रवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. या अपघातात त्यांच्या चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार योगेश कदम हे खेडहून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशी माहिती मिळाली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर आमदार योगेश कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईला जात असताना माझ्या गाडीचा अपघात झाला होता. रात्री १०.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. परंतु आई जगदंबेच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने मी माझे सर्व सहकारी सुखरूप आहेत. आपण कोणीही आमची चिंता करू नका. आज एका मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो आहे. मला कोणत्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही. त्यासोबतच माझे पुढील सर्व नियोजित कार्यक्रम नियोजित वेळेवर पार पडणार आहे असं योगेश कदम म्हणाले आहेत.
दखल न्यूज महाराष्ट्र.

शनिवार, दि. ७ जानेवारी
आयुर्झिलच्या ट्रिटमेंटने दरवर्षी ५००० पेक्षा जास्त मणक्याच्या शस्त्रक्रिया टाळल्या जातात.
आपणही सांध्या मणक्याच्या शस्रक्रिया टाळू शकता, आयुर्झिलच्या उपचारपद्धतीने दर महिन्याला मिळते अनेकांना वेदनांपासुन मुक्ती
रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या प्रतिक्रिया आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता
एक्सरे, एमआरआय पेक्षा कमी खर्चात संपूर्ण उपचार
♦️ नियम ♦️
१.गर्दी टाळण्यासाठी अगोदर नावनोंदणी अत्यावश्यक
२. क्लिनिकने दिलेल्या वेळेतच हजर रहाणे बंधनकारक
🏪 उपलब्ध उपचार:-
मणकाविकार, कंबरदुखी, मान- पाठदुखी, गुडघेदुखी, संधीवात, सांधेदुखी, पॅरालिसिस
शाखा: अलिबाग | दापोली | चिपळूण | रत्नागिरी | कोल्हापूर | कणकवली
पत्ता-
🏥
आयुर्झिल स्पाइन क्लिनिक्स
सिद्धिविनायक अपार्टमेंट
ICICI Bank समोर,
माजगाव रोड, मारूती मंदिर,
रत्नागिरी
नावनोंदणी संपर्क: www.ayurzeal.com
☎ 9819424233