बातम्या

राज्यस्तरीय बालगट तायक्वांदो स्पर्धेकरता रत्नागिरी तालुक्यातील आमीत जाधव यांची तायक्वांडो संघ प्रशिक्षक म्हणून निवड..

रत्नागिरी- तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व रत्नागिरी तायकवाँडो स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांचा संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य बालगट तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा दि. 16ते 18 मार्च दरम्यान स्पर्धा रत्नागिरी जिल्हा मधील डेरवन क्रीडा संकुल सावर्डे चिपळूण जिमनेस्टीक हॉल येते होणार आहे सदर राज्य स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील अधिकृत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रांनिग सेंटर नाचणे ओम साई चे प्रशिक्षक ब्लॅक बेल्ट 2 दान अमित रेवतकुमार जाधव यांची जिल्हा संघाचे व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे
या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग असणार आहे सदर राज्य स्पर्धा करिता जिल्हा संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याने तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया चे सहसचिव तसेच तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव मिलिंद पाठारे रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशन कोषाध्यक्ष (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) श्री वेंकटेश्वरराव कररा जिल्हा महासचिव श्री लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक )युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रांनिग सेंटर अध्यक्ष राम कररा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!