▶️ तक्रारदार- पुरुष वय 29 वर्षें ,
▶️ आरोपी- 1. उल्हास विश्वनाथ मुरुडकर, वय ४६, मंडळ अधिकारी, देवळे, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी 2. संतोष महादेव मोघे, तलाठी सजा कानाकडी, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी लाचेची मागणी 25,000 /- रु. ▶️ लाच स्विकारली 25,000/- रू. हस्तगत रक्कम25,000/- रु
लाचेची मागणी – दि. 28/02/2023 व दि. 13/03/2023
▶️ लाच स्विकारली – दि. 29/03/2023 रोजी.13.43 वा.
लाचेचे कारण –. यातील तक्रारदार यांचे वडिलोपार्जित शेतजमीन मिळकतीवर तक्रारदार यांचे सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करून ते मंजुरीसाठी पाठविण्याकरिता यातील आरोपी लोकसेवक क्र. 2 यांनी दिनांक 28/02/2023 रोजी मोबाईल फोनची मागणी केलेली असून सदरची नोंद मंजूर करण्याकरिता यातील आरोपी लोकसेवक क्र. 1 यांनी दिनांक 28/02/2023 व दिनांक 13/03/2023 रोजी 25,000/- रू. लाच रक्कमेची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कम 25,000/- रू. आरोपी लोकसेवक क्रमांक. 1 यांनी आज रोजी स्वीकारली असता देवरुख येथे रंगेहाथ पकडण्यात आले असून आरोपी लोकसेवक क्र.1 व 2 यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
पुढील कारवाई चालू आहे…..
▶️ सापळा पथक – प्रवीण ताटे,पोलीस निरीक्षक, पोहवा/ संतोष कोळेकर, पोना/ दीपक आंबेकर, पो. शि. हेमंत पवार, पो. शि. राजेश गावकर,चापोना/प्रशांत कांबळे पर्यवेक्षण अधिकारी
श्री. सुशांत चव्हाण,
पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वी. रत्नागिरी
▶️ मार्गदर्शन अधिकारी
मा.श्री. सुनिल लोखंडे,
पोलिस अधीक्षक, ला.प्र. वि. ठाणे परिक्षेत्र मा.श्री.अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि., ठाणे परिक्षेत्र

▶️ आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी – मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी. रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.
संपर्क :-
१)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
रत्नागिरी कार्यालय फोन नं. 02352- 222893
दखल न्यूज महाराष्ट्र.
