बातम्या

नाटे पोकलेवाडीच्या शिवतेज कला, क्रिडा, सांस्कृतिक, मंडळाच्या “एक वही एक पेन” विधायक उपक्रमाचे वितरण….

राजापूर : प्रतिनिधी (प्रमोद तरळ ) तालुक्यातील नाटे गावात गेली कित्तेक वर्षे शिवतेज कला, क्रिडा, सांस्कृतिक, मंडळ पोकलेवाडी नाटे मंडळ कला, क्रिडा, सांस्कृतिक,क्षेत्रात कार्यरत आहे.वर्षभर उपरोक्त मंडळाच्या वतीने वाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थां साठी समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यामुळेच पंचक्रोशी आणि तालुक्यात शिवतेजच्या कार्याचा जणू ठसाच या मंडळाने उमटवला आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी पुन्हा एकदा उंच भरारी घेत मंडळाने “एक पेन एक वही” या उप्रकमाचे नियोजन करून शाळेतील मुलांना एक हात मदतीचा देण्याचा संकल्प केला होता.या विधायक उपक्रमासाठी दानशूर व्यक्तींनी आपल्या शक्य होईल. तेवढे एक हात मदतीचा देत मंडळाला दान दात्यांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्व शालेय मुलांना सर्व शालेय आवश्यक सर्व वस्तू सहित पावसाळी छत्री चे ही “मोफत वितरण” करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कला विभागाचे प्रमुख विलिंद प्रेमाजी मांडवकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख हेमंत यशवंत पोकले,क्रिडा विभाग प्रमुख गणेश बाळकृष्ण घाडी, प्रिती प्रकाश जवरे,ओमकार मांडवकर,रुपेश पोकले, महेश मांडवकर,राहुल पोकले,जयवंत हुंदळेकर, रुपेश मांडवकर, सत्यवान हुंदळेकर व मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी विषेश मेहनत घेतली.
या उपक्रमा बरोबरच वाडीतील महिलांसाठी सेनेटरी नॅपकीनचे “मोफत वितरण” करण्यात आले.या वितरणासाठी वाडीतील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. शिवतेज कला, क्रिडा, सांस्कृतिक, मंडळ पोकलेवाडी नाटे मंडळ चे विद्यमान अध्यक्ष राजेश प्रेमाजी मांडवकर यांनी वरील सर्व उपक्रमासाठी देणगीदार व मंडळाचे हितचिंतक यांचे विषेश आभार व्यक्त केले आहेत. व पुढील मंडळाच्या सर्व कामासाठी हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!