बातम्या

राजापूर येथील ब्रिटिशांच्या वखारीला प्रमोद जठारांची भेट….

माय राजापूरने केला शिवसॄष्टी उभारण्या संदर्भात आराखडा सादर.

राजापूर – (प्रमोद तरळ) शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या इंग्रज वखारीच्या जागेवर शिवसॄष्टी उभारण्यासाठी आवश्यक असलेला पाच कोटी रुपयांचा निधी शासनाच्या सिंधुरत्न समॄध्दी योजनेतून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिले ते मोदी ९ अभियानांतर्गत शहरांमध्ये होणाऱ्या सभेचा आढावा घेण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी वखारीस भेट देऊन पाहणी केली
माय राजापूर संस्थेचे उपाध्यक्ष संजयजी मांडवकर व सहकारी तसेच शिवप्रेमींनी श्री जठार यांची भेट घेऊन शिवसॄष्टी उभारण्या संदर्भात आराखडा सादर केला त्यांनी याची लागलीच दखल घेत शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली वखारीच्या जागी शिवसॄष्टी उभारावी यासाठी माय राजापूर संस्थेने चालविलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे श्री संजय मांडवकर यांनी सांगितले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतिक व ऐतिहासिक वास्तू वारसा ‌ जपण्याबरोबर पर्यटन वाढीसाठी शिवकालीन ‌वखार‌ ज्या जागेवर होती तेथेच बाहेरुन जुनी वखार ‌जशी होती तशी बांधून आतील भाग हा समाजपयोगी वापरात येईल ‌ यासाठी वखारीचे मूळ नकाशे (Drawings) प्राप्त करून जुने फोटोग्राफ अभ्यासून वखारीचे‌ पुनर्निर्माण करण्याचा आराखडा बनवला आहे तळमजल्यावर २५० माणसांचे सभागृह व पहिल्या मजल्यावर जुने दस्तऐवज असलेले वस्तुसंग्रहालय (Art Gallary)यांचा समावेश आहे आजूबाजूचा परिसर गढी पध्दतीने अस्तित्वातील‌ बुरुज व तटबंदी प्रमाणे संरक्षित करुन सुशोभित करण्याचा आराखडा माय राजापूरने दिला‌ यावेळी श्री जठार यांच्या समवेत माय‌ राजापूरचे संजय‌‌ मांडवकर भाजपा सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अनिलकुमार ‌करंगुटकर,भाजपा राजापूर शहर‌ अध्यक्ष विवेक गुरव उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!