I.N.D.I.A ची फोड सर्वांचा फुल स्टॉप होणार…
मुंबई : महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या हालचाली सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. देशातील विरोधी पक्षाचे दिग्गज नेते मुंबईत दाखल होत आहेत. विरोधी पक्षाच्या आघाडीची आज आणि उद्या मुंबई येथे बैठक होणार आहे. सत्ताधारी पक्षाकडून या बैठकीवर निशाणा साधला जात आहे.
मंत्री उदय सामंत यांनी इंडिया नावाची फोड करत ते म्हणाले आहेत की I चा अर्थ इंडियन काँग्रेस फुलस्टॉप, N म्हणजे एनसीपी फुलस्टॉप, DMK फुलस्टॉप, I इंडियन मुस्लिम लीग फुलस्टॉप, A म्हणजे आप आणि अन्य असलेले सगळे फुलस्टॉप. देशाच्या नावाचा राजकारणासाठी वापर करणे हे दुर्दैवीआहे. इंडिया आघाडीची बैठक ही पर्यटनाची बैठक आहे. राज्यात झालेली विकास कामे बघण्यासाठी कदाचित ते इकडे आले आहेत. कोस्टर हायवे बघतील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जे काम सुरू आहे ते बघतील. हा पर्यटनासाठीचा दौरा आहे या पलीकडे यातून काही निष्पन्न होणार नाही असा दावा मंत्री सामंत यांनी केला आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.
