शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ साठी प्रवेश सूचना..
राष्ट्रीय सेवा समिती ही नोंदणीकृत धर्मादाय संस्था असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सन १९८९ पासून रत्नागिरी जिल्ह्यात विवध सामाजिक उपक्रम सातत्यपूर्ण राबवत आहे. कै. बंडोपंत लिमये यांनी संस्थेला दान दिलेल्या सन्मित्र नगर रत्नागिरी येथील वास्तू मध्ये मागील सुमारे ३३ वर्षांपासून संस्थेचे विद्यार्थिनी वसतिगृह सुरु आहे. सुरक्षित तसेच संस्कारक्षम निवास आणि भोजन व्यवस्था, तीदेखील माफक व वाजवी शुल्कामध्ये हे या वसतिगृहाचे ठळक वैशिष्ट्य.
मागील काही वर्षांमध्ये रत्नागिरी हे कोकण प्रांतातील शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे शहर म्हणून वेगाने नावारूपाला येत आहे. यादृष्टीने शहरामध्ये विद्यार्थिनी वसतिगृहाची काळानुरूप वाढती गरज तसेच संस्थेच्या महिला सक्षमिकरणाबाबत असलेला दृष्टीकोन यातून राष्ट्रीय सेवा समिती रत्नागिरीने विद्यार्थिनी वसतिगृहाच्या तळ मजला अधिक दोन माजले असलेली नवीन सुसज्ज इमारत बांधून पूर्ण केली असून जून २०२३ पासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी सदर वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इयत्ता अकरावी पासून पुढील कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनी या वसतिगृहात प्रवेश घेऊ शकतात. वसतिगृहाची प्रवेश क्षमता ५० असून संस्थेच्या नियम व अटींना अधीन राहून वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल. वसतिगृहाचे मासिक शुल्क दरमहा रुपये ४५००/- इतके असून या मध्ये निवास तसेच दोन वेळचा चहा, दोन वेळ शाकहारी जेवण, एक वेळ नाश्ता याच्या शुल्काचा समावेश असेल.
वसतिगृहाची प्रमुख वैशिष्ठ्ये –
१. तळ मजला अधिक दोन मजले असे सुमारे ९००० चौ फुटाचे सुसज्ज व हवेशीर बांधकाम
२. सेल्फ कन्टेंट विद्यार्थिनी कक्ष संख्या – १८ (एका कक्षात ३ विद्यार्थिनी)
३. तळ मजल्यावर सुमारे ५०० चौ फुटाचे सुसज्ज भोजन व स्वयंपाकगृह
४. तळ मजल्यावर सुमारे १२०० चौ फुटाचे सुसज्ज सभागृह
या सुसज्ज वसतिगृहामुळे ग्रामीण भागातून तसेच अन्य गावातून शिक्षणासाठी रत्नागिरीत येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात उत्तम सोय उपलब्ध होणार आहे. तरी या वासतीगृहाबाबतची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थीनिन्पर्यंत पोचवावी असे नम्र आवाहन आहे.
धन्यवाद! राष्ट्रीय सेवा समिती रत्नागिरी
सूचना – वसतिगृह प्रवेश नियम, अटीं तसेच अधिक माहिती संस्थेच्या खालील संपर्क क्रमांकावर मिळू शकेल.
१. श्री. संतोष ज. पावरी (अध्यक्ष) – ९०११५६४३३२
२. श्री. आनंद माधव मराठे (उपाध्यक्ष) – ९४२२४३१४९०
३. श्री. अनिरुद्ध वि. लिमये (कार्यवाह) – ९४२२४३३७१७
४. अॅड. श्री. प्रशांत बा. पाध्ये (कोषाध्यक्ष) – ९४२२६३५८०४
५. श्री. दत्तात्रय पुरोहित (वसतिगृह प्रकल्प प्रमुख)- ९७३०४२७९९९ ५.
सौ. नेहाताई जोशी (वसतिगृह समिती सदस्य)- ९४०३१०२२९८.
संपर्क वेळ सकाळी ११ ते २
